ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरातील सकल जैन समाजाने साजरा केला श्री महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव

शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सकल जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकार श्री भगवान महावीर स्वामी यांचा 2624 वा जन्मकल्याणक महोत्सव देशासह परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला, देऊळगाव राजा शहरातील सर्व सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेत श्री भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा केला

 सविस्तर वृत्त असे की सकल जैन जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर व संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे व जिओ और जिने दो चा नारा देणारे श्री भगवान महावीर स्वामी यांचा 2624 वा जन्मकल्याणक महोत्सव धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम घेत साजरा करण्यात आला.

दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता शहरभर प्रभात फेरी काढून या मार्गावरील सर्व जैन मंदिरासमोर भगवंतांना मानवंदना देण्यात आली तर बस स्थानक चौकात नव्याने निर्माण झालेल्या महावीरस्तंभ ला सुद्धा मानवंदना देण्यात आली शहरभर मार्गक्रमित करत भगवंतांचा जयघोष करत सकल जैन समाजाच्या महिला पुरुष युवकांनी शहर दनाणून, सोडले भक्तिमय वातावरणात प्रभात फेरी मध्ये सर्वांनीच भगवंतांचे नामस्मरण केले, त्यानंतर जैन आश्रम मध्ये धर्मानुरागी परम मुनी भक्त देवेंद्र जिंतूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला तर श्री महावीर मंदिरात भगवंतांचा महा मस्तकाभिषेक सोहळा पार पडला.

दुपारी सकल जैन समाजातील समाज बांधवासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी पाच वाजता शहरातून भगवंतांची रथयात्रा काढण्यात आली रात्री जैन मंदिरात संगीतमय आरतीचे नियोजन करण्यात आले होते व नंतर रात्री भगवंताचा जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सकल जैन समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये