सांस्कृतिक कार्यक्रमातून महिलांचा सुप्त गुणांना वाव मिळतो – आमदार देवराव भोंगळे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महिलांना चूल आणि मूल यापासून वेळ मिळत नसल्याने ते नेहमी आपल्या घरकामातच व्यस्त असते. त्यांच्यात असलेले सुप्त गुण हे कुठेदरी दडल्या जाते. आपल्या अंगी असलेल्या गुणाचे सादरीकरण करण्याकरिता मंच देखील उपलब्ध नसतो. परतू सांस्कृतिक महोत्सव असा कार्यक्रम आहे की महिलाना आपल्या कला, गुणाचे सादरीकरण करण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांनमध्ये असलेल्या सुप्त गुणांना या माध्यमातून वाव मिळतो. एवढेच नाही तर यातूनच काही जिल्हा स्तर, राज्य स्तरावर, नावलौकिक प्राप्त होते. यानिमित्ताने महिलांनी संस्कृतिक महोत्सवाचा फायदा घेत जास्तीत जात महिलांनी सहभागी होवून स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी नांदा – बिबी येथे आयोजित आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक महिला महोत्सवा प्रसंगी व्यक्त केले.
बिबी येथे आमदार देवराव भोंगळे यांच संकल्पनेतून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक महिला महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी म्हणून विवेक बोढे जिल्हा महामंत्री भाजपा, अर्चना भोंगळे, किरण बोढे, संजय मुसळे तालुका अध्यक्ष भाजपा, सतीश उपलेंचवार संघटन महामंत्री कोरपना, अपर्णा उपलेंचवार, उपस्थित होते.
पुढे ते बोलताना म्हणाले की, या पद्धतीचे कार्यक्रम आमचा द्वारे नेहमीच आयोजित केल्या जाते. या वर्षी प्रथमच परिसरात सांस्कृतिक महिला महोत्सवाचे आयोजन केले. तुमचा असाच उदंड प्रतिसाद लाभला तर आपण परिसरात दरवर्षी संस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे आश्वस्त केले.
यावेळी आमदार देवराव भोंगळे व अर्चना भोंगळे तसेच विवेक बोढे व किरण बोढे यांचा नांदा – बिबी येथील भाजपा महिला मोर्चाचा वतीने सत्कार करण्यात आला.
तब्बेतीचा कारणाने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार महिला सांस्कृतिक महोत्सवास उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी फोन द्वारे महिलांना मार्गदर्शन करीत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
महिला सांस्कृतिक महोत्सवात फॅन्सी ड्रेस, एकल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम सुमनबाई कडूकर, द्वितीय पौर्णिमा आष्टेकर, तर तिसरा अश्विनी सोनवणे यांनी पटकावला.
एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक विना मोहितकर, द्वितीय क्रमांक कल्पना गेडाम, तिसरा क्रमांक निधी मडावी यांनी पटकावला.
समूह नृत्य प्रथम क्रमांक एम जे गृप गडचांदूर, द्वितीय क्रमांक श्रीराम गृप बिबी, तिसरा क्रमांक भीम कन्या गृप बिबी यांनी पटकावला.
सदर कार्यक्रमाचे संचालन आरती जमदाडे, ईश्वरी नक्षीने तर प्रास्तविक सुवर्णा आस्वले व आभार वंदना मुसळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य महिला सांस्कृतिक महोत्सवास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा यशस्वितेकरिता भाजपा युवा मोर्चा नांदा-बीबी, महिला मोर्चाचा सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.