ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :– शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथे विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यार्थी विकास विभाग यांच्या दिशा निर्देशानुसार तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा तयारी, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि महिला सक्षमीकरण, आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा होता.

शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडवाले होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय गोरे उपस्थित होते.

शिबिरातील प्रमुख सत्रे :

“कौशल्य विकास व स्वयंरोजगार” – मार्गदर्शक प्राचार्य प्रमोद खडसे (अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उपरवाही)”सायबर गुन्हे व सोशल मीडिया” – मार्गदर्शक मंहेश चव्हाण (गडचांदूर पोलीस स्टेशन)

“शिक्षकेत्तर उपक्रम व व्यक्तिमत्व विकास” – मार्गदर्शक प्रा. डॉ. राजेश खेरानी श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा “महिला सक्षमीकरण” – मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य स्मिताताई चिताडे ,महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर “स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी” –मार्गदर्शक प्रा. आशिष देरकर ,महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर”माय भारत पोर्टल – युवकांना संधी” – मार्गदर्शक प्रा. गुरुदास बलकी ,श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा यांनी वरील विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह होते. याप्रसंगी त्यांनी शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ .हेमलता सोनकुसरे , यांनी मानवी जीवनात आरोग्याचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रा.डॉ.संजय गोरे , प्रा.आशिष देरकर, प्रा. गुरुदास बल्की आदि मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. शरद बेलोरकर यांनी केले, तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेश गायधनी यांनी मानले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे सर्व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.

या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या कौशल्यांची माहिती मिळाली असून, त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये