ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उंबरखेड येथे अफूची शेती

17.25 लाखाचा ऐवज जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील उंबरखेड येथे अवैध अफू शेती उघडकीस आली आहे, स्थानीक गुन्हे शाखा आणि देऊळगाव राजा पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाई मध्ये 17 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली, सदर कारवाई 9 मार्च रोजी रात्री कऱण्यात आली.

उंबरखेड येथील शेतकरी उद्धव पाटीलबा कायंदे यांच्या शेतात अफूची शेती कऱण्यात आल्याचे उघडकीस आले आहे, विशेष म्हणजे तिळाच्या शेतात विना परवाना अफूची शेती कऱण्यात आल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांना शेतात 21 किलो 56 ग्रॅम अफूचे पीक आढळले,17 लाख 24 हजार 800 रूपये किंमतीची अफू, आणि 500 रूपयाचे ठिंबक सिंचन साहित्य जप्त केले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी बी महामुनी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, संतोष महल्ये यांच्या पथकाने केली,काही दिवसापूर्वी च अंढेरा येथे सुद्धा अफू शेती आढळून आली होती. पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये करीत आहे.

1 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे रुजू झाल्यापासून जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवित आहे, आजपावेतो जिल्ह्यात अमली पदार्थांच्या 9 केसेस करून गांजा व अफू मिळून 17 कोटी 84 लाख 16 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये