सेलू हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड
एकूण 5 लाख 13 हजाराचा माल जप्त करून नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, आज रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. सेलू हद्दीत गोपनीय माहितीगाराचे माहितीवरून प्रो. रेड केला असता नमूद तिन्ही आरोपी घटनास्थळ वरून पसार झाले, घटनास्थळ वरून मोहा गावठी दारू, उकळता मोहा सडवा रसायन, मोहा सडवा रसायन, इतर भट्टी साहित्य, 13 लोखंडी ड्रम तसेच मोहा गावठी दारूची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात येत असलेला एक तीन चाकी ऑटो असा एकुण जुमला किमंत 5,13,200/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्का जप्ती पंचनाम्या प्रमाने जागीच जप्त करून नाश करण्यात आला. तसेच 3 सि.ए. सँपल व एक तिन चाकी ऑटो जप्त करून पो.स्टे. सेलू , येथे आरोपी आशिष राय रा. हिंगणी अधिक 2 अनोळखी इसम (पसार) विरुद्ध कलम 65 B.C.E.F. 83 म.दा.का. सह क. 3(1), 181, 130/177 मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.