ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालक मालक यांचेवर देवळी पोलीसांची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधिक्षक सो. वर्धा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो. वर्धा तसेच मा. सहायक पोलीस अधिकक्ष सो. पुलगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शिंदे यांचे सह पोउपनि. अश्विन गजभिये, पोहवा, मनोज कांबळे, विनोद कांबळे, पोशि/मनोज नप्ते यांचे पोलीस स्टेशन देवळी येथील अवैध्य धंदयावर कारवाई करणा-या पथकाने दिनांक 08/03/2025 रोजी सकाळी 07.00 वा गोपनीय बातमी वरून देवळी, अंदोरी परीसरामध्ये काही ट्रॅक्टर रेतीची चोरटी वाहतुक करीत असल्याबाबत मिळालेल्या माहीतीच्या आधारे नमुद पथकाने देवळी, अंदोरी परीसरातुन 1. मौजा आंजी येथील ट्रक्टर चालक विनोद देविदास पचारे वय 29 वर्ष, रा.पडेगाव हा त्याचे ताब्यातील एक महींद्रा 585 डि.आय जिचा टि.सी. कमांक MH-32/TC-025 ट्रॅक्टर 2. मौजा अंदोरी येथे ट्रक्टर चालक मालक ऋषीकेश सदाशिव करलुके वय 24 वर्ष, रा.अंदोरी हा त्याचे ताब्यातील एक विना कमांकाचा महींद्रा 585 डि.आय कंपनीचा ट्रॅक्टर 3. देवळी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना ट्रक्टर चालक विनोद देविदास पचारे वय 29 वर्ष, रा.पडेगाव हा त्याचे ताब्यातील एक महींद्रा 585 डि.आय जिचा टि. सी. कमांक MH-32/TC-025 ट्रॅक्टर रेती भरून वाहतुक करीत असतांना मिळून आला. तिनही चालकांना त्यांचे ट्रॅक्टरमालकांबाबत माहीती विचारली असता अनुकमे 1. ट्रक्टर चा मालक सुनिल दादाजी ढोक रा.देवळी 2. राकेश सदाशिव करलुके वय 26 वर्ष, रा.अंदोरी 3. स्वप्निल बाबाराव भोयर, रा. आजी 4. रोहण लिलाधर देशमुख रा.आंजी यांचे सांगणेवरून नमुद रेती घाटांवरून विनापरवाना रेती काढून घेवून जातांना मिळुन आल्याने नमुद तिनही ट्रॅक्टर पोस्टे देवळी येथे घेवून येवून महसुल दंडात्मक कारवाई करीता मा. तहसीलदार कार्यालय, देवळी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये