विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या वतीने एसबीसीच्या दोन टक्के स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्याचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
एसबीसी अन्याय निवारण कृती समीती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एसबीसीच्या दोन टक्के स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्यांबाबत पुणे येथे संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या कार्यालयासमोर धरणा व साखळी उपोषण ५ ते ९ मार्च पर्यंत करण्यात येत आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देत विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या वतीने शासन स्तरावर मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना जिल्ह्यधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन मा.उपजिल्हाधिकारी याचेसोबत एसबीसीना दोन टक्के स्वतंत्र आरक्षण,स्वतंत्र वस्ती गृह स्थापन करण्यात यावे, विणकर आथीँक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे,शासकीय व निमशासकीय सेवेत एसबीसी प्रवर्गातुन पदोन्नती देण्यात यावी या मागण्यांसह अन्य मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.
सदर निवेदन व चर्चा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डाॅ.बंडूभाऊ आकनुरवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले.यावेळी संघटक तुलशीदास मारशेट्टीवार, पदाधिकारी मोरेश्वर कुरेवार, सुरेश तुम्मे,निलेश कटकमवार, राजेश मुलकावार, विपीन यंगलवार, श्रावण गुंडेटीवार उपस्थित होते.