ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘वनविभागाच्या वतीने’ जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी वनविभागाने हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

आज दि. 8 मार्च रोजी ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी यांच्या वतीने वनभवन ब्रह्मपुरी येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 उपवनसंरक्षक, कार्यालयीन अधीक्षक, लेखापालन, यांच्या मार्गदर्शनात आरोग्य शिबिराचे आयोजन करून विविध तपासण्या करण्यात आल्या.

 या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक, लेखापालन ,शिपाई महत्वाचे योगदान व सहकार्य केलें

अध्यक्षीय भाषणावेळी त्यांनी वनसंरक्षणामध्ये असणारा स्त्रियांचा वाटा याविषयी सादर करुन महिला दिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिले पाहिजे, असा मौलिक संदेश देऊन महिला दिनानिमित्त सर्व महिला वनकर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये