निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला “उत्कृष्ट महाविद्यालय” पुरस्काराने सन्मानित
"करियर कट्टा" स्पर्धा 2024 - 2025

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करिअर कट्टा” स्पर्धा 2024 -25 जिल्हास्तरीय निकाल घोषित झाला असून त्यात निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाला “उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांच्या वतीने महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे यांनी स्वीकारला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांना “उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक” जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार, प्रा. डॉ. अपर्णा धोटे यांना “उत्कृष्ट जिल्हा समन्वयक” पुरस्कार तसेच प्रा. डॉ. किरण जुमडे यांना “उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक” प्रथम पुरस्कार करिअर कट्टा च्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
करिअर कट्टा – 2024 या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय प्रथम पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांना विविध श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे व सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.