ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय कार्यकारणी ची बैठक लखनऊ येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दि.02/03/2025 ला लखनऊ येथे संपन्न झाली.या मध्ये बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशच्या पूर्व मुख्यमंत्री बहन कू.मायावती जी यांनी राष्ट्रीय कार्यकारणी च्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधीत केले व सर्व प्रदेश कार्यकारणी ची समीक्षा घेण्यात आली .देशामध्ये बेरोजगारीआहे.शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, शिक्षण,आरोग्य सेवा, अन्नधान्य यावर जी.एस. टी.लाऊन सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे जनमानसात जाऊन प्रस्थापित सत्ताधारी पक्ष बहुजन समाजासोबत कसा अन्याय,शोषण करीत आहे हे प्रबोधन करून जनतेमध्ये जागृती निर्माण करावी व येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक पणे निष्ठेने काम करावे.

असे आव्हान केले.सोबतच बहन मायावतीजी यांनी जाहीर केले की,आज नंतर माझ्या पक्षाचा कोणीही उत्तराधिकारी नसेल.मी जिवंत असे पर्यंत कोणीही उत्तराधिकारी नाही राहणार असे जाहीर केले.राष्ट्रीय कॉरडीनेटर आकाश आनंद यांना पद मुक्त केले.यांच्याकडे कुठलीही जबाबदारी असणार नाही असे जाहीर केले.या नंतर राष्ट्रीय कॉर्डीनेटर म्हणून आनंद कुमार साहेब व इंजी.रामजी गौतम साहेब यांची निवड करण्यात आली. मान्यवर कांशीराम साहेबाना अपेक्षित अशी मुहमेंट सर्वांनी उभी करून कार्य करावे असे आव्हान केले.या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे,प्रदेश महासचिव मुकुंददादा सोनवने, प्रदेश महासचिव हुलगेश चलवादी,प्रदेश कार्यकारणी सदस्य रामचंद्र जाधव उपस्थित होते.

माननीय आनंद कुमार साहेब व ईंजी.रामजी गौतम साहेब यांची राष्ट्रीय कॉर्डीनेटर म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र बहुजन समाज पार्टीच्या वतीने व वर्धा जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

आपला,

*जिल्हाध्यक्ष*

बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्हा 

*अनोमदर्शी भैसारे.*

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये