ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक

आरोपीचे ताब्यातुन मारोती स्विफ्ट कार सह एकुण ७ लाख ३३ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०८/०३/२०२५ रोजी पोलीस स्टेशन सेल परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर तर्फे खात्रीशिर खबर मिळाली की, १) साहील प्रमोद बडवाईक, वय २१ वर्षे, रा. खडकी, शाळेजवळ, ता. सेलु, जि. वर्धा, हा त्यांचे साथीदारासह त्याचे ताब्यातील मारोती सुझुकी कंम्पनीची पांढऱ्या रंगाचे कार क्रमांक एम.एच. ०४ एच.एफ. १२०८ या मध्ये देशी विदेशी दारू नागपुर जिल्हयातुन भरून त्या दारूची चोरटी वाहतुक सेलडीह मार्गे केळडार सेलु परीसरात करीत आहे.” अश्या माहीती वरून त्यांचे वर पोलीस स्टॉपचे मदतीने केळदार परीसरात नाकेबंदी करुन प्रोव्हीशन रेड केला असता तो जागीच मिळुन आला व त्यांचे ताव्यातील कार मध्ये त्यांचे सोबत बसून असलेला त्याचा साथीदार नामे २) राहुल पुरूषोत्तम लाखे रा. केळझर, ता. सेलु जि. वर्षा यास पोलीसांची चाहुल लागताच पसार झाला पंचासमक्ष त्याचे ताव्यातील मारोती सुझुकी कंपनीची मॉडेल स्वीफट कार क्रमांक एम. एच. ०४ एच. एफ. १२०८ ची पाहणी केली असता कारचे डिक्कीमध्ये व मधातील सिटवर ओसी ब्ल्यु व ओसी या बिदेशी दारुने भरलेल्या खरडयाच्या १४ पेटया मीळून आल्या. पंचासमक्ष सदर विदेशी दारुच्या पेट्यांची पाहणी करुन साहील बडवाईक यास विदेशी दारु बाळगणेबाबत पास परवाना विचारला असता त्याने नसल्याचे सांगीतल्याने त्याचे ताब्यातून १) ०९ खरडयाचे खोक्यात ऑफिसर चॉईस ब्ल्यु कंपणीच्या विदेशी दारुने भरलेल्या १८० एम.एल.च्या ४३२ सिलबंद काचेच्या शिशा ज्यावर बेंच नं. ४०० ता. १६/११/२४ असा असुन प्रति नग ३५०/-रु. प्रमाणे कि. १,५१,२००/- रु. २) ०५ खरड्याचे खोक्यात ऑफिसर चॉईस कंपणीच्या विदेशी दारुने भरलेल्या १८० एम.एल. च्या २४० सिलवंद प्लास्टीक शिशा ज्यावर बॅच नं. ६६ ता. २५/०२/२५ असा असुन प्रति नग ३००/-रु. प्रमाणे कि. ७२,०००/-रु. ३) एक जुना वापरता विवो कंपनीचा अॅढाईल गोल्डन रंगाचा मोबाईल कि. १०,००० ४) एक जुनी वापरती मारोती सुझुकी कंपनीची स्वीफट कार पांढऱ्या रंगाची क्रमांक एम.एच. ०४ एच एफ. १२०८ असा असलेली किंमत ५,००,०००/- रू असा एकुण जुमला ७,३३,२००/- रूपयाचा माल विदेशी दारूचा साठा मिळुन आल्याने आरोपी साहील बडवाईके याचे ताब्यातुन जप्त करून ताब्यात घेतला. सदरचा विदेशी दारूचा साठा त्याने नागपुर शहरातील छत्रपती चौकात असलेल्या रजत वाईन शॉप येथील चालका कडुन विकत घेवुन आनल्याबाबत माहिती दिली असुन तिन्ही आरोपीतांन विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि श्री. अमोल लगड, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कावळे, गोपाल बावणकर, अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर सर्वं नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये