युवा समाजसेवक डॉ.उदयकुमार पगाडे “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार-२०२५” ने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
स्वच्छतेचे जनक, थोर समाजसेवी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील “पहाट फाऊंडेशन” मार्फत दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी रविवारला वर्धमान जैन भवन, शेगाव येथे “राज्यस्तरीय ग्रामविकास परिषद” आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्रातील क्रीडा, समाजसेवा, सांस्कृतिक, शिक्षण, कला,राजकीय, पर्यावरण अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले व्यक्ती उपस्थित होते. त्या सर्वांना त्यांच्या उत्तम कामगिरी बध्दल मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याचे आयोजक संस्थेने ठरविले होते.
यामध्ये, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विभागात मागील अनेक वर्षांपासून समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवा समाजसेवक, न्यु लाईफ बहुद्देशीय संस्थचे संस्थापक – डॉ.उदयकुमार सुरेश पगाडे (३० वर्षे) यांना “राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार – २०२५” देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या स्वरूपात सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ, सन्मानपत्र देण्यात आले.
विषमतेला बाजूला सारत, समतेचा वसा घेऊन, मानवतेसाठी करीत असलेल्या समाजसेवेच्या कार्याला लक्षात घेत, देश -विदेशातील १०० पेक्षा जास्त नावाजलेल्या संस्थांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कार देऊन श्री.उदयकुमार पगाडे यांना आजवर सन्मानित केलेले आहे.
ह्यामध्ये विशेषतः राज्यस्तरीय आदर्श युवक पुरस्कार, मानद डॉक्टरेट पदवी पुरस्कार, सावित्रिज्योती राज्यस्तरीय पुरस्कार, जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार, युथ आयकॉन अवॉर्ड, नॅशनल बेस्ट युथ सोसियल अवॉर्ड, जिल्हा युवा पुरस्कार, अश्या १०० पेक्षा जास्त जागतिक स्तरांवरील पुरस्कारांवर यांनी आपले नाव कोरून, ब्रम्हपुरी शहराची सामाजिक क्षेत्रात एक वेगळीच ओळख संपूर्ण देशात निर्माण केलेली आहे.