ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आजी आजोबांचा सन्मान सोहळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा येथे आजी- आजोबांचा पाद्यपूजन करून सन्मान सोहळा संपन्न झाला.

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल देऊळगाव राजा मध्ये आजी-आजोबा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबा आणि पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले .

विदयार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे विचार मांडले.सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण करून पाद्यपूजा केली. यामुळे सर्व उपस्थित आजी -आजोबा भारावून गेले.

कांताबाई पलोदकर या आजी नी बोलताना सांगितले की आजी – आजोबाच काही घरामध्ये ओझ झालं आहे पण आज या सोहळ्याला उपस्थित राहून अस वाटतय की हे ओझ नाही आता माझ वाटायला लागलं आहे.

अशा भावना या आजी नी व्यक्त केल्या

आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कारही देत आहेत तसेच पालक आणि आजी आजोबांनी ही विद्यार्थ्यांना संस्कार देण्यात हातभार लावावा आणि एक नवी पिढी घडवण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा संस्थेचे सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आजी-आजोबाकडे व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी आजी-आजोबांना ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला

 यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रेसिडेंट डॉ मिनलताई शेळके , सेक्रेटरी डॉ.रामप्रसाद शेळके, सीईओ सुजित गुप्ता शैक्षणिक प्रमुख प्रिन्सिपल डॉ. प्रियंका देशमुख मॅडम उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा इंगळे मॅडम आणि मनीषा जगताप मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी

शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये