ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीसाईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणेम्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.
सर्वप्रथम संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, लाड सर यांनी गाडगे बाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन श्री वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरव पानघाटे यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.