तीन मार्च नंतर आंदोलनाची रूपरेषा
निप्पाण प्रकल्पग्रस्तांची आमदार अडबोले यांच्या नेतृत्वात बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ढोरवासा परिसरातील निपाण डेन्रो प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी काही जमीन न्यू ग्रेटा कंपनीला हस्तांतरित करण्याचे प्रयत्न चोख पोलीस बंदोबस्तात चालविण्यात आले आहे. याविरोधात समोरील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी नैक व्हील सिमेंट वर्क्स येथे आमदार सुधाकर अडबोले यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत एमआयडीसी विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.
येत्या तीन मार्चपासून शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्याची रूपरेषा या बैठकीत ठरवण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अद्यापही प्रलंबित आहे. प्रकल्पग्रस्तांना प्रति एकर दहा लाख रुपये जमिनीचा मोबदला व अडीच एकरामागे प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. आधी या मागण्या पूर्ण करण्यात याव्या व त्यानंतरच जमिनीचे संबंधित कंपनीला हस्तांतरण करण्यात यावे अशी मागणी या बैठकीत प्रकल्पग्रस्तांतर्फे करण्यात आली आहे.
सदर बैठकीला आमदार सुधाकर अडबोले, वासुदेव ठाकरे,मधुकर सावनकर, प्रवीण सातपुते, संदीप खुटेमाटे, बंडू भादेकर,सुधीर सातपुते, बापू सोयाम, लिमेश माणूसमारे, तेज करण बदखल, आकाश जूनघरी आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन लिमेश माणूसमारे यांनी तर आभार चेतन गुंडावार यांनी मानले.