ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील राजुरा व कोरपना तालुक्यात रिपाइंचा पहिल्यांदाच विस्तार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब यांची दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ ला अमरावती येथे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मागील कितीतरी दिवसांपासून आमची पक्ष सभासदत्व मागणी होती शाल पुष्पगुच्छानी सत्कार करून पक्षात सामील करून गवई साहेबांनी पूर्ण केली.

    बैठकीत झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाची सहयोगी संघटना समता सैनिक दलाची उभारणी करण्यात यावी, या मागणीच्या संदर्भात सुद्धा गवई साहेबांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून यांची सुद्धा लवकरच उभारणी करण्याचे ठरविण्यात आले.

     सदर प्रसंगी अशोककुमार उमरे गडचांदूर, सुरजभाऊ उपरे हरदोना, प्रभाकर खाडे गडचांदूर, जगजीवन बोरकर गडचांदूर, अनंताभाऊ रामटेके नांदाफाटा, उमाकांत वाघमारे चिंचोली, हंसराज ताकसांडे उपरवाही, रामदास रामटेके उपरवाही इत्यादींना क्रियाशील सभासद बनविण्यात आले.

       लवकरच राजुरा विधानसभा मतदारसंघात व्यापक प्रमाणात पक्ष सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये