ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मोदी@9 महाजनसंपर्क अभियानानिमित्त चंद्रपुरात रविवारी सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद

 चांदा ब्लास्ट

पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी रविवार, २५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या, सभेत जनतेशी संवाद साधणार आहेत.

यावेळी सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया,माजी आमदार व सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला नागरिकांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये