ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव मही येथे नवीन कायदे विषयक कार्यशाळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पोलीस स्टेशन देऊळगाव राजा अंतर्गत ग्राम देऊळगाव मही पोलीस चौकी येथे नविन कायदेविषयक कार्यशाळा 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली

कार्यशाळामधे मार्गदर्शक म्हणून सरकारी विधीतज्ञ श्री अनिल शेळके,पोलीस निरीक्षक संतोष महल्ले ठाणेदार देऊळगाव राजा, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय दे.राजा वाचक फौजदार श्री विश्वनाथ राठोड यांनी बी एन् एस, बी एन एस एस व बी एस ए या तीनही नवीन कायदे विषयक तसेच महिला अत्याचार कायदे विषयी,अ.जा.ज अ.प्र.का सुधारणा कायदा तसेच सायबर क्राईम,सध्याच्या सायबर क्राईमच्या आरोपींच्या फसवणुकीच्या पद्धती बाबत सायबर गुन्हे, बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम,दारूबंदी अधिनियम, याबाबत सविस्तर माहिती देऊन नवीन कायदेविषयक माहिती त्यांच्या मित्रमंडळी, आप्तेष्ट नातेवाईकांना, घराशेजारील नागरीकांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या.. यावेळी ग्राम देऊळगाव मही पोलीस चौकी येथे पोलीस पाटील,सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित 45 ते 50 नागरिक उपस्थित होते…

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये