ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी जोगदंड सर,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा. आरजु आगलावे, समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर, प्रा. आशिष देरकर, प्रा. प्रदिप परसूटकर, प्रा. सुधीर थीपे उपस्थित होते.

सर्वप्रथम संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा. नितीन वाढई यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. नितीन वाढई यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये