खडकपूर्णा जलाशयामध्ये 02 बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उडविल्या
तहसिलदार देउळगावराजा व पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपूर्णा जलशयात आज दिनांक 07 फेब्रुवारी रोजी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटीची शोध मोहीम घेवुन वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देऊळगावराजा, सायली जाधव, नायब तहसिलदार, विजय हिरवे, मंडळ अधिकारी मेहुणाराजा, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, गजानन टेकाळे, महसूल सेवक शरद काकडे, विठठल यांचे पथकाच्या साहाय्याने मौजे मेहुनाराजा शिवारात चोखामेळा जलाशयाकाठी 01 बोट व मौजे चिंचखेड शिवारात चोखामेळा जलाशयाकाठी 01 बोट अशा एकुण 02 अवैध रेती उपसा करणा-या बोटी आढळून आल्या. दोन्हीं बोटी जिलेटिन च्या साह्याने उडवुन जागेवरच नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननचा प्रयत्न झाल्यास जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाचे मार्फत अवैध उत्खननाबाबत वारंवार कारवाई करण्यात येईल. तसेच जे शेतकरी रेतीच्या अवैध उत्खननास रस्ता उपलब्ध करुन, अवैध रेतीसाठा करण्यास सहाकार्य करतील त्यांच्या 7/12 वर याबाबतचा बोजा चढविण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक होवु नये यासाठी गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे.
अशी माहिती तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी दिली आहे.