ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

महावीर इंटरनॅशनल सेंटरचा उपक्रम ; जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लायन्स क्लब चंद्रपूर आणि महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोज रविवारला विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले आहे.

“जनसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून महावीर इंटरनॅशनल सावलीतर्फे मागील बावीस वर्षापासून सदर शिबिराचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे या शिबिरात निवडलेल्या रुग्णांची मोफत भिंगारोपन शस्त्रक्रिया सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्रतज्ञांच्या हस्ते करण्यात येईल.सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील नेत्र विभागातील चमू विनामूल्य मोतीबिंदू शिबिरात डोळ्याची तपासणी करतील. मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिरातील रुग्णांचे सावली ते सेवाग्राम येथे नेण्याची व वापस आणण्याची सोय लायन्स आय सेंटर सेवाग्राम च्या बसणे मोफत करण्यात येईल. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था व औषधे विनामूल्य देण्यात येईल. डोळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी जाण्याच्या तयारीने यावे, रुग्णांनी स्वतःचे गरम कपडे,पांघरून व इतर आवश्यक कपडे आणणे आवश्यक राहील.

शिबिरात येताना रुग्णांनी सोबत आधार कार्ड,रेशन कार्ड,वोटिंग कार्ड सोबत आणल्याशिवाय रुग्णांची तपासणी केली जाणार नाही. तरी आयोजित शिबिरामध्ये परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली तर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये