माजी जिल्हा परिषद सदस्यासह मुलावर चाकूने हल्ला
घराच्या वादावरून झाला हल्ला : तालुक्यातील वायगाव (तुकूम ) येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील वायगाव येथे घर खरेदी केल्याच्या वादावरून माजी जिल्हा परिषद सदस्य व त्याचा मुलगा याच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता घडली.
मारोती वामन गायकवाड वय ५० वर्ष माजी जिल्हा परिषद सदस्य व रामेश्वर मारुती गायकवाड २३ ( मुलगा ) राहणार वायगाव तुकूम अशी जखमी ची नावे आहेत. तर मधुकर गणपत नवघरे व अशोक कुरेकर राहणार वायगाव तुकूम अशी आरोपींची नावे आहे. मधुकर नवघरे यांची आई अशिक्षित असल्याने ६ जानेवारी २०१४ ला मारोती गायकवाड यांनी एक लाख ८५ हजारात मधुकर यांचे घर खरेदी केले.
मात्र या प्रकाराबाबत मधुकर व त्याची आई यांना काहीच माहिती नव्हती सेवानिवृत्त होऊन गावात राहण्यासाठी आले तर हा प्रकार उघडकीस आला यानंतर वारंवार मारोती यांना घराच्या खरेदी बाबत जाब विचारत होते. दिनांक २ फेब्रुवारीला घटनेच्या दिवशी शेत शिवारात मधुकर व त्याचा मित्र अशोक हे दोघे वाद करत होते. त्या दरम्यान मधुकर यांनी मारोती गायकवाड यांचे गळ्यावर , पाठीवर व पोटावर चाकूने वार करून जखमी केले. मुलगा रामेश्वर वडीलाचा बचाव करण्यासाठी आला असता त्याला सुद्धा चाकूने वार करून जखमी केले.
जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.