ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझी वसुंधरा दिंडीने दुमदुमले स्मार्ट ग्राम बिबी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीने संपूर्ण स्मार्ट ग्राम बिबीला जागरूकतेच्या संदेशांनी दुमदुमून टाकले.

या दिंडीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर, ग्रामपंचायत बिबी, गुरुदेव सेवा मंडळ, महात्मा गांधी पुतळा समिती तसेच गावातील विविध महिला भारुड भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दिंडी दरम्यान, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.

         गावातील प्रमुख रस्त्यांवरून गेलेल्या या दिंडीने “वृक्ष लावा, वृक्ष वाचवा”, “प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सहभागी मंडळांनी भारुड आणि भजनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत जनतेला पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले.

         कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरणप्रेमींनी १०० बांबुंचे वृक्षारोपण करून हरित भविष्याची शपथ घेतली. स्थानिक नागरिक व युवकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. माझी वसुंधरा दिंडी गावाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये