वर्धा जिल्हा कारागृहातील बंदी-बांधव तसेच कारागृह अधिकारी कर्मचारी करीता संपुर्ण आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २५/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदी बांधव तसेच कारागृह अधिकारी कर्मचारी यांचेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा यांचे मार्फत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरामध्ये BP, शुगर, ECG, त्वचारोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा, अस्थिरोग तज्ञ, मौखिक आरोग्य, संसर्गजन्य रोग, क्षयरोग, व्हायरल हिपॅटायटीस, मानसिक आरोग्य तपासणी, रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये वर्धा जिल्हा कारागृह येथील बंदीस्त असलेल्या बंदयाची तपासणी करण्यात आली आहे.
तसेच संशयीत रुग्ण असलेल्या बंदयावर योग्य औषधोपचार करण्यात आलेला आहे. सदर शिबीरामध्ये पुरुष बंदी १२१, महीला बंदी १७ व तृतीयपंथी बंदी ०१ असे एकुण १३९ बंदयांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम मा. जिल्हा शल्य चिकीत्सक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाने कारागृह वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. रश्मी गोडे, यांच्या निगराणित तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते पार पडला.
सामान्य रुग्णालय, वर्धा तंबाखु नियंत्रण विभाग चमु, मलेरिया तपासणी चमु, कुष्ठरोग तपासणी चमु. क्षयरोग तपासणी चमु, रक्त तपासणी चमु हिंद महालॅब, सामान्य रुग्णालय, वर्धा तसेच करागृह अधीक्षक श्री. नितीन क्षिरसागर, कारागृह वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. रश्मी गोडे, तुरुंगाधिकारी श्री. जितेंद्र भावसार, तुरुंगाधिकारी सुहास नागमोते. सुभेदार संजय वंजारी, शिपाई श्री. अमित कोठारकर, श्री. अतुल जाधव, लोकेश ठाकरे, ईत्यादी कारागृह कर्मचारी उपस्थीत होते.