Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

वाघाच्या कातडी सह दोघांना अटक – वनविभागाची मोठी कारवाई

अटक झालेल्यांत चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपींचा समावेश

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

वन्य प्राण्यांची शिकार करणे, प्राण्यांचे मांस सेवन करणे, विक्री करणे, प्रांतांच्या विविध अवयवांची विक्री करणे, वाघांची नखे, मिषा, हाडे, कातडी इत्यादींची तस्करी करणे कायद्याने गुन्हा असला तरीही तस्करी करणारे लोक वन्य प्राणी हत्या करत असतात. वनविभाग नेहमीच अशा तस्कर व शिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असते.

भंडारा आणि नागपूर वनविभागाच्या पथकाने आधीच संयुक्त कारवाई करत पवनी तालुक्यातील निलज नाक्याजवळ एका अल्पवयीन (अंदाजे 8 ते 10 महिन्यांच्या) वाघाच्या कातडीसह 2 तस्करांना अटक केली. वनविभागाला मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार चंद्रपूर येथील एका व्यक्तीच्या वडिलांकडे 10 वर्षांपासून वाघाची कातडी असुन त्या कातडीची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नागपूर वन्यजीव विभागाला पवनी येथे वाघाच्या कातड्यांच्या संभाव्य तस्करीची गुप्त माहिती मिळत होती. वनविभागाने तस्करांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेसाठी वनविभाग भंडारा व बुटीबोरी, नागपूर यांचे विशेष पथके तयार करण्यात आली होती. हे कातडे जप्त करण्यासाठी वनविभागाने सापळा रचून अखेर बुधवारी सकाळी 10.30 वाजता पवनी तहसीलच्या निलज ब्लॉकजवळ चंद्रपूर येथील नीलेश सुधाकर गुजराथी (३३) आणि विकास बथली बाथ (३१, रा. चंद्रपूर) अशा दोघांना अडवून झडती घेतली असता त्यांच्या ॲक्टिवा क्र. एमएच-३४-सीबी-२७१७ मधे वाघाचे 2.5 फूट लांब कातडे आढळून आले.

वनविभागाच्या पथकाने आरोपींना वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 विरुद्ध विविध कलमान्वये वनविभागाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली. संबंधित आरोपींची चौकशी केली असता वाघाचे कातडे 10 वर्ष जुने असल्याची कबुली दिली आहे. ही कातडी त्याच्या वडिलांनी चंद्रपूर जिल्ह्यातून तंत्रमंत्र विद्येसाठी आणल्याची माहिती आरोपीने तपास पथकांना दिली. त्याचे वडील कातडावर बसून ध्यान करीत असत. वडिलांच्या मृत्यूनंतर कोविड काळात घराची साफसफाई करताना आरोपींना ही कातडी मिळाली. पैशाच्या लोभापायी तो खरेदीदार शोधत होता.

सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक नागपूर) रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भरतसिंह हाडा, उप वनसंरक्षक (प्रादेशिक भंडारा) राहुल गवई, विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी.जी. कोडापे, रेंजर हिरालाल बारसागडे (प्रदेश पवनी), रेंजर प्रमोद वाडे (प्रदेश बुटीबोरी), संजय मेंढे (फिरते पथक भंडारा), गार्ड निलेश तवले, दिनेश पडवळ, आर. एस. पोरटे, ठुळे, वासनिक व वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. पुढील तपास सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये