Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

‘आरोग्यासाठी धावूया, प्रगतीकडे जाऊया!’

विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन – फिनिक्स अकॅडमी वर्धा तर्फे विशेष उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत फिनिक्स अकॅडमी वर्धा यांनी एक विशेष विदर्भस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथून सकाळी होणार असून, शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्पर्धेचे स्वरूप:

स्पर्धा दोन प्रमुख गटांमध्ये विभागली आहे:

1. १६ वर्षांखालील गट (तीन किलोमीटर):

या गटातील स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजाज चौक, मेन पोस्ट ऑफिस, सेंट अँथोनी स्कूल मार्गे परत शिवाजी महाराज चौक असा प्रवास करतील.

2. खुल्या गटातील स्पर्धा (पाच किलोमीटर) :

स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज चौक, बजाज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, विश्राम गृह रोड, नगर परिषद रोड, आरती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत धावतील.

स्पर्धेतील आकर्षण :

विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार असून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात येईल.

प्रत्येक सहभागी स्पर्धकासाठी स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे.

नोंदणी शुल्क फक्त ₹५० असून, स्पर्धेच्या दिवशी सकाळी ६ वाजेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

प्रमुख व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती:

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दीपक करंडे असतील. उद्घाटन मेजर डॉ. श्रीकांत कांदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुण्यांमध्ये बिपिन मोघे, शंकर गोडे, राहुल चांदूरकर, राजाभाऊ ताकसांडे, श्रीकांत भगत, सचिन सोनूने, अरविंद तायडे, मुरलीधर बेलखोडे, आणि शिवाजी चौधरी यांचा समावेश असेल.

विद्यार्थ्यांसाठी संदेश:

आयोजक नितेश कराळे यांनी विदर्भातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यासाठी एक नवा संकल्प करावा. असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये