हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर : घुग्घुस येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना (उबाठा) तर्फे नगरपरिषद कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:०० वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा नगरपरिषद कार्यालयाला भेट म्हणून देण्यात आल्या.
कार्यक्रमाला शिवसेना (उबाठा) घुग्घुस अध्यक्ष बंटी घोरपडे, चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष), प्रभाकर चिकनकर, बाळू चिकनकर, गणेश शेंडे, अजय जोगी, योगेश भांदककर, रघुनाथ धोंगडे, गणेश उईके, मारोती जुमनाके, वेदप्रकाश मेहता, गजानन बांदुरकर, लक्ष्मण बोबडे, अनुप कोंगरे, राजू नाथर, गणेश वझे, पंकज बावणे, पवन नागपुरे, अमित बोरकर आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि त्यांच्या कार्यावर चर्चा केली तसेच समाजातील योगदानाची आठवण ठेवली.