Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर खेळविण्यात येणाऱ्या जुगारावर रेड

आरोपीतांकडुन ३ लाख ३६ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १७/०१/२०२५ रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात गोपनिय माहीतीच्या आधारे गोल बाजार, तसेच आठवडी बाजार, हिंगणघाट येथील दुकाणात व्हिडीओ गेम पार्लरचा मालक समीर शेख, विशाल माथनकर व समीरसिंग भादां हे त्याचे नोकरांचे मदतीने व्हिडीओ गेम पार्लरमधील ईलेक्ट्रॉनीक मशिनवर संगणमताने तेथे येणाऱ्या ग्राहकांकडुन नगदी पैशाच्या स्वरूपात रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढया रकमेची ईलेक्ट्रॉनीक मशिनवर चाबी भरून दिल्यानंतर त्या ईलेक्ट्रॉनीक मशिनवर येणाऱ्या फिरत्या आकडयांवर स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता पैशाची पैज लावून हारजितचा जुगार खेळवत आहे. अश्या माहीतीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापे टाकले असता व्हिडीओ गेम पार्लरवा मालक १) समिर वाहीद खॉ पठाण वय ३० वर्ष, रा.. निशानपुरा, हिंगणघाट, वर्धा, २) अब्दुल जाहीर अब्दुल मतीन वय २६ वर्ष, रा. निशानपुरा वार्ड हिंगणघाट, वर्धा ३) विशाल बंदीशराव माथनकर, वय ३० वर्ष, रा. शास्वीवार्ड, तिवारी लेआउट, हिंगणघाट, वर्धा चालक ४) पंकज श्यामरावजी मेश्राम वय ३२ वर्ष, रा. शास्त्री वार्ड, ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा, तसेच तेथील खेळणारे ग्राहक ५) किशोर कानुजी मगरे, वय २९ वर्ष, रा. तुकडोजी वार्ड, सरकारी हॉस्पीटल मागे, हिंगणघाट, जि. वर्धा, ६) उमेर शेख सादीक शेख, वय १८ वर्ष, रा. निशानपुरा, सिलेंडर गोडावून जवळ, हिंगणघाट, जिल्हा वर्धा, ७) सिध्दार्थ वसंता पथाळे, वय ४३ वर्ष, रा. भिमनगर, लोटन चौक, हिंगणघाट, जि. वर्धा, ८) समीरसिंग भादा रा. शिख मोहल्ला, हिंगणघाट, वर्धा, ९) तनवरी खाँ नईम खाँ पठाण, वय २५ वर्ष, रा. निशानपुरा, हिंगणघाट, यांना ताब्यात घेवून त्याच्याकडुन १) व्हिडीओ गेम पार्लर मधील १३ इलेक्ट्रॉनीक मशिन त्यांचे चाव्यांसह विंग्स टेक, विंन, स्पेशल बोनस मिंट, हाय ५ फाईव्ह, वॉल, मास्टर, अशा वेगवेगळया कंपनीच्या मशिन आहे २) प्लॉस्टीक चेअर १३ नग ३) तिन मोबाईल ४) एक कॅम्पुटर मशिन ५) एकुण नगदी १८,९५०/- रू, असा एकुण जु.कि. ३,३६,८५०/- रू.चा मुद्देमाल गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करून ताब्यात घेतला. पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे कलम ४, ५ जुगार कायदयान्वे गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे,

अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनि श्री. प्रकाश लसुंते, शिवकुमार परदेशी, पोलीस अंमलदार गजानन लामसे, हमीद शेख, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे, दिपक साठे, उदय सोळंकी, मुकेश ढोके, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये