Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बिबी येथील सावित्रीबाई महिला बचत गटाकडून सार्वत्रिक हळद कुंकू कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महिला आनंदात, थाटात एकमेकांना तीळ गूळ भरवून मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो. बिबी या गावात सुद्धा मागील काही वर्षापासून महिलांचा एकत्रित हळद कुंकू कार्यक्रम साजरा केल्या जातो. यावर्षी देखील सावित्रीबाई महिला बचत गटाच्या माध्यमातून हळद कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांच्या अर्धांगिनी अर्चना भोंगळे, किरण बोढे, सरपंच माधुरी टेकाम , सुनिता पावडे चंद्रकला सिरसागर, ग्रामपंचायत सदस्य दुर्गा पेंदोर उपस्थित होत्या.

महिलांचे जीवन हे नेहमीच काबाडकष्ट करण्यात व्यस्त असतात. मुलं बाळ सांभाळून आपला घर संसार सुद्धा चालवावा लागतो. त्यामुळे वर्षातून एकदा येणारा हा सण महिलांसाठी पर्वणीच असते. आणि तो महिला उत्साहात सुद्धा साजरा करतो. आनंदोत्सव साजरा करीत असतांना महिलांनी तीळगुळा प्रमाणे नात्यातही गोडवा जपला पाहिजे आणि समाजात महिलांवर विविध अन्याय होतात या अन्यायाला वाचा फोडण्या करीता सावित्रीच्या लेकी सुद्धा बनल्या पाहिजे. असे मत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अर्चना भोंगळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन स्नेहल उपरे प्रास्तविक पूजा खोके यांनी केले तर आभार चंद्रकला क्षीरसागर यांनी मानले. यावेळी गावातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता सावित्री महिला बचत गटाचा सदस्या, सुनिता पावडे, लता आस्वले, इंदुबाई काळे, कुंदा चटप, सुनिता अंदनकर, अल्का पिंगे, निर्मला गिरटकर, मीरा बोबडे, माया मुंगुल यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये