Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर कॅम्पसमध्ये फ्रेशर्स पार्टीचा जल्लोष

“फ्रेशर्स पार्टी केवळ आनंदोत्सव नसून नव्या विद्यार्थ्यांसाठी परिचय आणि मैत्रीचा सेतू.": डॉ. राजेश इंगोले

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईचे , महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे २७ डिसेंबर२०२४ रोजी फ्रेशर्स पार्टीचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवख्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अत्यंत सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या पुजल पंजवानी यांचे स्वागत करून करण्यात आली. सहायक कुलसचिव डॉ. बालू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, आणि सांस्कृतिक प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी वाणी यांचे स्वागत बी.सी.ए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी हरशिल पटेल हिने केले.

डॉ. इंगोले यांनी आपल्या भाषणात असे नमूद केले की, “फ्रेशर्स पार्टी केवळ आनंदोत्सव नसून विद्यार्थ्यांना एकमेकांना जाणून घेण्याची आणि कॅम्पसच्या संस्कृतीशी जोडून घेण्याची संधी देते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले आहे, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.”

कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी झिक्रा आणि सुहानी यांनी ऐकल गीत सादर केले, त्यानंतर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सोलो वॉक, ड्युएट वॉक, आणि प्रश्नोत्तर सत्र अशा तीन फेऱ्या झाल्या तसेच नृत्य ही समाविष्ट होते याचे परीक्षण प्रमुख पाहुण्या पुजल पंजवानी यांनी केले. त्यांनी विद्यार्थिनींना रॅम्प वॉकसाठी उपयुक्त मार्गदर्शनही केले, ज्यामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह वाढला.

  अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश होता. गाण्यांद्वारे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मोहित केले. रॅम्प वॉकमागचा उद्देश विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढवणे, स्टेजवरील सादरीकरण कौशल्य विकसित करणे, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव देणे असा होता.

‘मिस फ्रेशर’ म्हणून पलक रावत हिला निवडण्यात आले. तिच्या व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, आणि विविध सादरीकरणातील सहभागाच्या जोरावर तिने हा किताब मिळवला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बी . एम. एस विभागाच्या विद्यार्थीनी गुंजा आणि श्रावणी यांनी उत्साहाने केले, तर व्यवस्थापनाची जबाबदारी बी. सी. ए. च्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींनी कौशल्याने सांभाळली. अपेक्षा पिंपळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईचे, महार्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर कॅम्पसने नव्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय बनवला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये