ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजेचा धक्का लागून मोतीलाल लाड या युवकाचा मृत्यू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जुना जालना रोडवरील दुर्गापुरा भागात गणपती मंडळाचे स्टेजचे पत्रे काढत असताना मोतीलाल लाड (३५)या युवकाचा विजेच्या तारा ला स्पर्श होताच मृत्यु झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली.

 मृतक नामे मोतीलाल विष्णु लाड, वय 35 वर्षे, रा दुर्गापुरा, देउळगाव राजा हा हरीदास किराना समोर, जुना जालना रोड, देउळगाव राजा येथे असलेल्या गणपती मंडळाचे स्टेजचे पत्रावर जावुन सामान काढत असतांना अचानक त्याचा हात तेथे वर असलेल्या थ्री फेजच्या विजेच्या ताराला हात लागल्याने तो विजेचा शॉक लागुन मरण पावला . मृतकचा भाऊ जयंत लाड यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर सानप करीत आहे.

बालाजी व गणेश भक्त असलेल्या मोतीलाल ऊर्फ पप्पू लाड याच्या अकस्मात मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे, अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले, यावेळी जनसमुदाय लोटला होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये