गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपुर परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम

एकुण कि. 6 लाख 12 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन समुद्रपुर डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर ब.नं. 261, पो.ना. रवि पुरोहित ब.नं. 1245, पो.शि. वैभव चरडे ब.नं. 1626, चा.पो.हवा. श्रीकृष्ण इंगळे ब.नं. 330 व 14 गृह रक्षक दलाच्या सैनिकांनी आज दि 28/06/2023 रोजी पो.स्टे. समुद्रपुर परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान जमिनीत गाढुन व झुडपात लपवुन असलेले एकुण 153 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 10,950 लीटर गावठी मोहा दारूच्या निर्मिती करीता तयार करण्यात आलेला कच्चा मोहा सडवा रसायण, तीन पोत्यामध्ये अंदाजे 150 किलो गुळ व भट्टी साहित्य असा एकुण कि. 6,12,000 रू चा माल मिळुन आल्याने, तसेच सदरचा मुद्देमाल हा आरोपी नामे नंदलाल राउत, उमेश फुलमाळी, विनोद पवार, दिनेश पवार सर्व रा. गणेशपुर पारधी बेडा यांचे मालकिचा असल्याचे निष्पन्न झाल्याने, जप्ती पंचनामा कार्यवाही प्रमाणे संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीचं नाश करण्यात आला. 04 आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे कलम 65(एफ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये