आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री शिवाजी महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांकरीता समपूदेशन

स्वतःची किंमत करायला शिका - डॉ. महेश पाचकवडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरटकर

राजुरा येथील प्रसिद्ध असलेले श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे समाजशास्त्र विभागाद्वारे दि. 11 जुलै 2023 ला सकाळी 11 वाजता किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख मार्गदशक म्हणून डॉ. महेश पाचकवडे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वतः आपण आपली किंमत करायला शिका. स्वतःच आरोग्य सांभाळा. तुम्ही स्वतःची किंमत केली नाही, तुम्ही मेले तरी लोकांना काहीही फरक पडत नाही. जगात आपली कवडीची किंमत नाही. स्वतःची किंमत तेंव्हाच होईल जेव्हा आपण आपले आरोग्य सांभाळू, स्वतःला योग्य घडवू, स्वतःसाठी वेळ देऊ, स्वतःला सुसंस्कृत करू. तसेच किशोरवयात होणारे शरीरातील बदल, समस्या व त्यावरील उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, यांनी विध्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करून सतत त्यानुसार वागण्याचे प्रयत्न करावे त्यामुळे तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल असे सांगितले. उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. विठ्ठल शा. आत्राम यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका अंजली वारकड यांनी केले. तर आभार प्रा. एस. बी. अंगलवार सर यांनी केले. या कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये