Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

स्वराज नगर येथे नायलॉन मांजा जप्त

भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        पशुपक्षी तथा मानवी जीवितास धोका असलेल्या व प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्या जवळून 3 हजार 600 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी दिनांक सात रोज मंगळवार ला शहरातील स्वराज नगर येथे केली.

स्वराज नगर येथे नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून सदर मांज्याची विक्री करणाऱ्या दीपक संजय मेश्राम यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त करून याबाबत गुन्हा दाखल केला. सदर कारवाई गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, रोहित चिटगिरे, योगेश घाटोळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये