Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्ध्यात पंचशील ध्वज दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

बौद्ध धम्म ध्वज पहिल्यांदा 28 मे 1885 रोजी वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सार्वजनिकरित्या फडकवण्यात आला. 1952 मध्ये बौद्ध ग्लोबल कौन्सिलमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून या ध्वजाला मान्यता देण्यात आली. दर वर्षी 8 जानेवारी हा दिवस धम्म ध्वज, पंचशील ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो.

या ध्वजामध्ये क्रमाने निळा, पिवळा, लाल, पांढरा आणि केशरी अश्या रंगांचा समावेश होतो. काही देशांमध्ये केशरी रंगाच्या ठिकाणी गुलाबी आदी रंगाचा उपयोग केला जातो.

वर्ध्याच्या सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचशिल ध्वज फडकवला तसेच धम्म ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, पराग धवन, वसंता भगत, सोनू कांबळे, पंकज लभाणे, गोलू हाडके, रोहित यादव,सुरज बडगे,सुरज दुपारे, अमित नाईक, विकास जंजाळ, सुभाष थुल, अमरदिप कांबळे, संजोग मेश्राम आदी बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये