ताज्या घडामोडी

कोंबडा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

दोन लाखाच्या वर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट ————-+——–+++——-++-+++——–
सावली:(प्रा.शेखर प्यारमवार)
पोलीस स्टेशन सावली अंतर्गत सामदा गावाच्या शेतशिवरात कोंबडा झुंज लाऊन जुगार सुरू असल्याची माहिती दिनांक २५/१२/२३ रोजी सकाळी १० वाजता दरम्यान मिळाली असता सापळा रचून कारवाई केली.यामध्ये सावली पोलिसांनी आरोपी ६ ताब्यात घेतले.

आरोपींकडून ४ मोटर सायकल सहित अंग झडतीत नगदी तसेच कोंबडे व कात्या मिळून असा *एकूण किंमत २,०२२८०/- रु* चा मुद्देमाल जप्त केला गेला.
आरोपी १) किशोर शंकर चलाख रा सोनापुर २) बालाजी कृष्णा मेश्राम रा सोनापुर ३) अशोक गुरुदास गेडाम रा व्याहाड बु ४) अतुल शामराव शेंडे रा सामदा ५) महेश मारुती गेडाम रा व्याहाड बू ६) नितेश सदाशिव भुरसे रा सोनापुर यांचेवर जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांचे आदेशान्वये ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनखाली पोलीस उपनीरिक्षक एकनाथ राठोड, सहाय्यक फौजदार चरण मडावी,हेड कॉन्स्टेबल संजय शुक्ला,दिलीप मोहुर्ले,कॉन्स्टेबल चंद्रशेखर गंपलवार,धीरज पिदुरकर,अशोक मडावी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये