ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्गापूरात दानदिवस कार्तिक धम्मउत्सव

चांदा ब्लास्ट

धम्मदायाद मेत्ता संघ तथा धम्म प्रसार समिती दुर्गापूरच्या विद्यमाने कार्यान्वित ‘बौध्द सभ्यता रूजवन संवर्धन व अभिवृध्दी अभियान” अंतर्गत बौध्दांच्या स्वतंत्र कालगणनेनुसार जुण्ह १५ कत्तिक २५६८ बुध्दवर्ष अर्थात शनिवार दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी येणाऱ्या कार्तिक पूर्णिमेला दुर्गापूर येथील प्रसिध्द हर्षल कानव्हेंट मध्ये सुरू असलेल्या धम्मसिखापदं सन्डे स्कूल येथे सायंकालिन ‘दानदिवस कार्तिक धम्मउत्सव’ आयोजित केला आहे.

            बौध्द सभ्यतेनुसार आश्विन ते कार्तिक मास हा दानाचा महिना म्हणून ओळखला जातो. या दान मासाचा शेवट कार्तिक पूर्णिमेला समाप्त होतो. यास्तव या बुध्दकालिन दान परंपरेचे सांस्कृतीक व बौध्दीक महत्त्व विषद करण्याकरीता कार्तिक धम्मोत्सवाचे आयोजन केले आहे. आयोजित समारंभात बुध्दकालीन दान परंपरेची भावना व आजचे स्वरूप मुळ बुध्द धम्माच्या सरंक्षणार्थ श्रीलंकन संघर्षाची यशोगाथा दायिका विशाखा मिगार मातेचे धम्मासाठी दानाचा आदर्श दायक सुदत्त अनाथपिंडकाच्या दानाची नवप्रेरणा. दानदिवसाला समर्पक विषयावरील धम्मदेसने सोबतच धम्मसिक्खापदं सन्डे स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारा धम्मशैक्षणिक उपक्रम प्रस्तुत केले जाणार आहेत.

            यास्तव चंद्रपूर ऊर्जानगर तथा चंद्रपूर परिसारातील धम्मप्रिय बांधवांनी सायंकाळी  वाजता अगारिक शरद मानकर यांचे घरप्रांगणातील हर्षल कानव्हेंटसत्यशोधक चंदुबाबा मठाचे मागेदुर्गापूर येथे उपस्थित राहून सांस्कृतीक प्रबोधन उत्सवाचा लाभ घ्यावा. असे प्रचारिका संघाच्या संगीता मानकरकविता नळेमीना वालदे व छाया वालदे यांनी एका प्रसिदी पत्रकाद्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये