ताज्या घडामोडी

वाघाने चारगावात चार म्हशी तर कचराळा येथे एक बकरी केली ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तालुक्यातील चारगाव येथील शेत शिवारात पट्टेदार वाघाने चार मशी ठार केल्या तर कचराडा येथे गावात घुसून एक बकरी ठार केल्याची घटना दिनांक ३ जानेवारी च्या मध्यरात्री घडली.

तालुक्यात सध्या पट्टेदार वाघाचा धुमाकूळ सुरू आहे तालुक्यातील चारगाव येथील विकास धानकी यांच्या शेतशिवारात चराईसाठी सोडलेल्या म्हशीला पटेदार वाघाने हल्ला करून ठार केले यांचे दोन लाख ४० हजाराचे नुकसान झाले आहे त्यातच कचराळा येथे पट्टेदार वाघ गावात घुसून गोठ्यात बांधलेली बकरी फस्त केल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती होताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जनावराच्या मालकांनी नुकसान भरपाईची मागणी वन विभागाकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये