ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटरसायकल चोरी करणारे चोरटे सेवाग्राम पोलीसांच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे अनिकेत देविदासजी सुरजुसे रा. गोजी यांनी दिनांक 21.05.2024 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्यांची दुचाकी क्र. MH-32-AM-4216, व त्यांचे गावातीलच प्रभाकर दुरगवार यांची दुचाकी क्र. MH-32-AA-1951 ही दिनांक 20.05.2024 ते दिनांक 21.05.2024 चे रात्रदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहे अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

          सदर गुन्ह्यात तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपी 1)अब्दुल साबीर अब्दुल रहमान वय 26 वर्ष व 2) मोहसिन बिसमिल्लाह शहा वय 32 वर्ष दोन्ही रा. कामरगांव ता. कारंजा(लाड) जि. वाशिम यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून तिन स्लेंडर व एक पॅशन प्रो. अशा एकुण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

          सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात श्री. विनित घागे ठाणेदार पोलीस स्टेशन, सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. वाल्मीक बांबर्डे, पो.हवा. हरीदास काकड, पो.ना. संजय लाडे, पो.शि. अभय इंगळे, प्रदिप कुचनकर, नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच गोविंद मुंडे सायबर सेल यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये