Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न

चंदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,गडचांदूर या महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ कार्यक्रम आज दिनांक ०२/०१/०२०२५ रोज गुरूवारला संपन्न झाला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे. वाचाल तर वाचाल या सूत्राप्रमाणे युवांमधील विविध उपक्रमशीलतेला मोठा वाव मिळू शकतो. वाचन संस्कृती वृध्दीगत करण्यासाठी आमच्या महाविद्यालयातही आम्ही बुकेच्या ऐवजी पुस्तक रुपी भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत करतो असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोहर बांदरे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाची रूपरेषा वाचन संवाद, सामूहिक वाचन व कथन रूपाने समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. पटले, प्रा.वानखेडे.प्रा. शर्मा, प्रा. वैद्य प्रा. मून यांनी मदत केली. तर कु. शबाना,श्री. गोरे, श्री शेरकी, श्री करमनकर , श्री. पोटे,श्री. पिंपळकर,श्री. खोब्रागडे,श्री मांडवकर श्री मेश्राम,श्री दुबे,व श्री मेंढी, हे शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी हजर होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये