Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

समर्थ कृषी व शैक्षणिक संकुल येथे समर्थ ज्युनियर कॉलेज देऊळगाव राजा आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न झाली, या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे उदघाटन श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

        याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, समर्थ ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य सचिन घुगे, समर्थ औषध निर्माण शास्त्र चे प्राचार्य डॉ प्रफुल्ल ताठे, गट समन्वयक बबनराव कुमठे, पंचायत समिती अधीक्षक विनोद सोनवणे, केंद्रप्रमुख गणेश उगले, मधुकर केवट, सुनील मुळे, भास्कर शिंगणे, गणेश इलग, भगवान थोरात अध्यक्ष ता विज्ञान संघटना, ज्योती सांगळे व रामेश्वर कुटे उपाध्यक्ष ता विज्ञान संघटना, संतोष थोरात, राजेश नागरे यांची उपस्थिती होती.

     याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनीचे मुख्य उदघाटक सतीश कायंदे यांनी बालवैज्ञानिकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तालुका विज्ञान संघटना व पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे देखील या आयोजनाबाबत कौतुक केले. याप्रसंगी डॉ नितीन मेहेत्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विज्ञान व विज्ञानाचे महत्त्व तसेच येणार युग हे विज्ञानाच असल्यामुळे आपण विज्ञानावर संशोधन करून कसे पुढे जाता येईल याबाबत मार्गदर्शन केले, तर डॉ प्रफुल्ल ताठे यांनी विज्ञान व आजचा विद्यार्थी याबाबत चर्चा करत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टीकोण कशा प्रकारे जपावा याबद्दल मार्गदर्शन केले, तर गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करत बालवैज्ञानिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान घुगे तर सर्वांचे आभार ज्योती सांगळे यांनी मानले.

      या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्यातील 70 शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन आपले प्रयोग सादर केले तसेच या प्रयोगांचे मूल्यमापन करून गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच या उत्कृष्ट आयोजनाबद्दल समर्थ ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व संपूर्ण सहकाऱ्यांचे शिक्षण विभाग पंचायत समिती व तालुका विज्ञान संघटना देऊळगाव राजा यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला. ही तालुकास्तरीय प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी समर्थ ज्युनिअर कॉलेज देऊळगाव राजाचे प्राचार्य सचिन घुगे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये