रेल्वे प्रवाशी गाडीमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांना अटक
स्थानीक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर यांना यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नवीन वर्षात रेल्वे हददीतून अवैध दारू वाहतूक होण्याची शक्यता असल्याने यावर प्रतिबंध आणण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी विशेष सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानीक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर येथील पथक तयार करून रेल्वे स्टेशन चंद्रपूर ते वर्धा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गांडयावर गुन्हेगार वाच लावण्यात आली होती. दि. 01/01/2025 रोजी स्था.गु.शाखेचे पथकाला गुप्त बातमीदारकडून खात्रीशीर माहिती मिळाली की. गाडी क. 22110 बल्लारशाह मुबंई एक्स मधून रे.स्टे. वरोरा येथून एक इसम अवैधरित्या दारू वाहतूक करीत आहे यावरून सदर गाडी चेक करीत असतांना एक इसम गाडीचे कोच क. एस/7 मध्ये एक पांढरी व लालरंगाची बॅग घेवून संशयास्पद रित्या दिसून आल्याने त्यास नावगाव विचारपूस केली असता त्याने आपले नाव अनिकेत विनायकराव बारापात्रे वय 25 वर्षे रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट जि. वर्धा असे सांगून त्याचे जवळील बॅगेची झडती घेतली असता बॅगमध्ये 1) old mank xxx rum दारूची बॉटल 750 एमएल ची एक नग किमंत 720/ रू., 2) Royal stag डिलक्स विस्की च्या चार बॉटल प्रत्येकी कि. 380/- रू. एकुण कि. 1520/- रू, 3) MC Dowell’s No.1 व्हिस्की ची 180 ML. ची बॉटल कि. 160/- रू. 4) Royal stag डिलक्स विस्की कं. ची 2 लीटरची प्लॉस्टिक बॉटल कि. 1950/- रू. (2) पांढ-या रंगाची थैली त्यामध्ये TUBORG strong असे लिहिलेले हिरव्या रंगाचे 22 बियरचे टिनचे डब्बे प्रत्येकी कि. 150/- रू. एकुण कि. 3300/- रू. च्या बियरच्या बॅटला असा एकुण 8190/- रू. चा माल मिळून आल्याने तो रितसर जप्त करण्यात आला. याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अपराध क्रमांक 02/2025 कलम 65.अ (ई), 66 (ब), 77अ महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपुर व श्री संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग अकोला यांचे मार्गदर्शनात श्री विकास कानपिल्लेवार, स्था.गु.शाखा यांचे सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पो.ना. नितिन शेंडे, पो.शि. पंकज बाते व रे.पो.स्टे. वर्धा येथील पो.शि. डेहनकर यांनी केली.