गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. रामनगर हद्दीत नाकेबंदी करून दारूबंदी कायद्यान्वये रेड

देशी विदेशी दारू माल, मोबाइल व स्विफ्ट कारसह 6 लाख 33 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        पो. स्टे. – रामनगर अप क्र.– 658/23कलम :-65(अ)(ई),77(अ),82,83 म.दा. का घटनास्थळ कारला रोड वैष्णवी कॉम्प्लेक्स जवळ. वर्धा, फिर्यादी यांनी पंच व पोलीस स्टाफ चे मदतीने नाकेबंदी करून यातील नमूद आरोपी 1) योगेश अनिलराव निनावे वय 27 वर्ष सर्कस ग्राउंड जवळ वर्धा याचेवर प्रो रेड केला असता त्याचे ताब्यातील फोर व्हीलर सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची शिफ्ट चार चाकी वाहन क्रमांक एम एच 31 सी आर 4400 मध्ये देशी विदेशी दारूची अवैधरित्या विना पास परवाना वाहतूक करीत असताना मिळून आला त्याचे ताब्यातून1) एक जुनी वापरती मारुती सुजूकी कंपनीची स्वीफ्ट कार क्र. MH-31-CR-4400 की. 5,00,000 रु. 2) 180 मल च्या विदेशी दारू ने भरून असलेल्या कंपनीच्या 83 काचेच्या शिष्या प्रति शिशी 350 रूप प्रमाणे 29050/-  3)ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल च्या एकूण ८२ निपा प्रत्येकी 3०० रु प्रमाणे २४६००/- रु. ४) १८० ml च्या विदेशी दारू ने भरून असलेल्या ऑफिसर 40 कंपनीच्या 220 प्लास्टिकच्या शिष्या प्रतिशत 250 रूप प्रमाणे एकूण 55000 रुपये 5) 90 एम एल च्या देशी दारू ने भरून असलेल्या टॅंगो कंपनीच्या 210 प्लास्टिक शिष्या प्रती नग 70 रुपये प्रमाणे एकूण 14 हजार 700 रुपये 6) एक जुना वापरता काळा रंगाचा व कंपनीचा मोबाईल किं 10000रुपये असा एकूण जु.कि 6,33,350/- रु.चा मुद्देमाल मौका जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त केला आरोपी 1) योगेश अनिलराव निनावे वय 27 वर्ष सर्कस ग्राउंड जवळ वर्धा यास सदरचा दारूचा माल कुठून आणला याबाबत विचारणा केली असता सदरचा दारूचा माल 2) मुकेश जयस्वाल राहणार बोरगाव धांदे तालुका धामणगाव जिल्हा अमरावती (अटक नाही) यांनी विक्रीकरिता मला पुरवठा केला असल्याचे सांगितले यावरून आरोपी 2) मुकेश जयस्वाल राहणार बोरगाव धांदे तालुका धामणगाव जिल्हा अमरावती (अटक नाही ) यास वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे हे माहीत असताना सुद्धा त्याने हेतू पुरस्कर आरोपी 1) योगेश अनिलराव निनावे वय 27 वर्ष सर्कस ग्राउंड जवळ वर्धा यास सदरची दारू वर्धा जिल्ह्यात विक्री करिता पुरवठा करून सहाय्य केले आहे अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून व कागदपत्रावरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

          सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन रामनगर चे पो.नी. मा. श्री. महेश चव्हाण यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शना पोलीस स्टाफ व गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये