ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी रोजगारक्षम शिक्षण घ्यावे – आमदार सुभाष धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अंबुजा सिमेंट फौंडेशन पुरस्कृत कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्था, उपरवाही च्या वतीने 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी आमदार सुभाष धोटे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,आजचे युग हे स्पर्धेचे युग आहेत, त्यामुळे यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन जिद्द व चिकाटीने रोजगार क्षम शिक्षण घेण्यावर भर द्यावा, विद्यार्थ्यांनी अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चे अल्पावधीतच रोजगार देणारे किमान कौशल्य वर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजे, अंबुजा ने परिसरातील प्रत्येक गावात अभ्यासिका निर्माण करून स्थानिक युवकांना सक्षम होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे सांगितले,

याप्रसंगी राजुरा व कोरपना तालुक्यातील भेंडवी,हरदोना बु,हरदोना खु,हिरापूर, इसापूर, मंगी,कुकुडसाथ,लखमापूर,पिंपळगाव,थट्रा,उपरवाही, सोनापूर,येथिल 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,सदर कार्यक्रम अंबुजा सिमेंट लि चे ऑपेशन हेड मा श्री के सुब्बुलक्ष्मण, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे प्रमुख श्रीकांत कुंभारे,अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चे प्राचार्य प्रमोद खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल बोरकुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश सुभे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेडी च्या सर्व प्राध्यापकानी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये