ताज्या घडामोडी

वाघाच्या हल्ल्यात दुर्गा ठार

परिसरात दहशत

चांदा ब्लास्ट :

तळोधी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत  असलेल्या आकापूरच्या शेत  शिवारात महिलेला वाघाने ठार   केल्याची घटना आज दि 12-7-2023 रोजी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास  आकापूर येथील शेतशिवारात घडली.हा प्रकार रात्री 8.30 च्या सुमारास उघडकीस आला.

सविस्तर वृत्त असे आहे की सौ दुर्गा जीवन चनफने (47 वर्ष)ही महिला शेतात  काम करण्यासाठी गेली.उशीर झाल्यावरही ती परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला असता तिचे शीर नसलेले शव आढळून आले. दबा धरून बसलेल्या वाघाने दुर्गा जीवन चनफने या महिलेवर हल्ला केला व ठार केले.अशी चर्चा आता सुरू आहे. ग्रामपंचायत आकापूर ने  दि 6-3-2023 रोजी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालय तळोधी इथे पत्र दिले होते परंतु वनविभागाने ग्रामपंचायत च्या पत्राकडे दुर्लक्ष केले व वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीही उपाय योजना केली नाही, असा आरोप आकापूर येथील नागरिक करीत आहेत. महिलेचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे नेण्यात आले.या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.घटनास्थळी वन अधिकारी दाखल झाले.उशिरा रात्री पर्यंत लोकांनी एकच गर्दी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये