ताज्या घडामोडी

शिवजयंती हा राष्ट्र भक्तांचा सण व्हावा – घरोघरी जयंती साजरी करावी बालगोपलांचा मानस

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैचा राजुरा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ¬ा उत्साहात जगभर साजरी करण्यात येते. चौका-चौकात शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. मात्र आजच्या काळात ह्या उत्सवाला दिखाऊपणा आलेला असुन शिव छत्रपतींचे विचार त्यांचे पराक्रम समाजाच्या सर्व स्तरांत पोहचविण्यासाठी ह्या उत्सवाचा उपयोग न होता केवळ धांगडधिंगा घालण्यासाठी ढोल-ताशे व डी.जे.च्या गजरात मिरवणुकही काढली जाते.

राजुरा तालुक्यातील धोपटटाळा गावात देखिल अशी मिरवणूक निघते. गावातील बालगोपाल अशा कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून दरवर्षी जातात मात्र यावर्षी थोडे सुजाण झालेल्या ओजस्वी व रेहांश ह्यांनी आपल्या पालकांकडे शिव जयंतीला धांगडधिंगा न घालता परिसरातील मावळ्यांना आपल्या घरीच शिवजयंती उत्सवासाठी आमंत्रित करण्याचा आग्रह धरला. मुलांच्या संकल्पनेला पालक गजानन तपासे ह्यांनी उचलून धरले.

त्यांनी तत्काळ आपल्या घरी शिव जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन शेजारील लोकांना आपली संकल्पना सांगुन घरोघरी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकावून तसेच तोरण बांधुन शिव जयंती उत्सव म्हणून नाही तर राष्ट्र भक्तांचा सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले व बाल गोपलांना आपल्या घरी आमंत्रित केले.

चिमुकल्यांनी सर्वप्रथम शिवरायांच्या मुर्तीला पुष्पामाला अर्पण करुन शिवरायांच्या नावाचा जयघोष केला. पालकांनी मुलांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या व महाराजांच्या राष्ट्र प्रेमाचे, स्वराज्याचे व पराक्रमाचे किस्से सांगुन मुलांनी आपले जीवन त्यांच्या आदर्शानुसार घडविण्यासाठी काय व कसे प्रयत्न करायचे ह्याचे धडे दिले. महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांचे तोंड गोड करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी माँसाहेब जिजाऊंच्या भुमिकेत कु. ओजस्वी गजानन तपासे व कु. माही सुरज पिंपळशेंडे तर शिवरायांच्या भुमीकेत चि. रेहांश चंद्रकांत तपासे ही चिमुकले सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. चंद्रकांत तपासे, सौ. प्रिती तपासे, सौ. पुजा सुरज पिंपळशेंडे यांची मोलाची मदत लाभली. भविष्यात प्रत्येक घरोघरी सर्व थोर महापुरुषांचे जयंती उत्सव अशाच प्रकारे साजरे व्हावे अशी आशा आयोजकांनी बाळगली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये