Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पाईपलाईन खोदकाम करताना मलबा खचला…   

35 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू तर एक जखमी    

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर शिवारात खल्याळ गव्हाण रोड लगत पाईप लाईनचे लिकीज जेसीबी द्वारे काढत असताना उकडलेल्या बारा फूट गड्ड्यामध्ये अचानक मलबा खचल्याने खाली असलेल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी घडली.

सविस्तर वृत्त असे की. डोलखेडा, खुर्द येथील शेतकरी मृतक दिलीप गजानन डोईफोडे वय 35 वर्ष डोलखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना आणि त्यांचा भाऊ बद्री गजानन डोईफोडे हे त्यांच्या शेत सिंचनासाठी असलेल्या पाईपलाईन वर लिकेज आढळले ते तालुक्यातील सिनगाव जहांगीर परिसरात खल्ल्याळगव्हाण रोड लगत जेसीबी द्वारे पाईप लाईन लिकेज काढत होते गड्डा खोदून बारा फूट झालेला असताना लिकेज काढण्यासाठी मृतक आणि त्यांचा भाऊ सदर गड्ड्यात उतरले सदर सदर ठिकाणचा जमिनीचा भाग पाईपलाईन गळतीमुळे ओला झालेला होता.

खोल गड्ड्यामध्ये पाईपलाईन लिकीज काढत असताना अचानक गडाच्या बाजूला असलेला मलबा खचला मध्ये दोघेही मलब्याखाली दबले त्यानंतर जेसीबी द्वारे मलबा हटवल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले रुग्णवाहिकेद्वारे त्यांना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टर अक्षय गुटे आणि इतर डॉक्टर चमूने दिलीप गजानन डोईफोडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्या असल्याने मृत घोषित केले गंभीर जखमी त्यांचा भाऊ बद्री डोईफोडे यांना अधिक उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले.

घटनेची फिर्याद समाधान बाबुराव डोईफोडे यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिली त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये