Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्षमता बांधणी (कॅपॅसिटी बिल्डिंग) चा कार्यक्रम आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग (MSME) या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या RAMP प्रोजेक्ट च्या अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. वर्धा येथे IIM नागपूर इन्फेड, लघु उद्योग भरती वर्धा आणि जिल्हा प्रशासन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्षमता बांधणी (कॅपॅसिटी बिल्डिंग) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री. विवेक देशपांडे स्पेसवूड फर्निचर चे को-फाउंडर आणि डायरेक्टर यांनी उपस्थितांना आपल्या उद्योगाचे सूक्ष्म आणि कार्यक्षम व्यवस्थापण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले त्याचबरोबर स्वतःचे अनुभव व्यक्त केलेत.

डॉ. शंतनू जोग हे एक कॉर्पोरेट वकील आणि सी एस आहेत त्यांनी उपस्थितांना आपल्या उद्योगांसाठी बौद्धिक मालकी हक्क असणे किती आणि कसे गरजेचे आहेत याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. नीलकंठ ढोणे IIM नागपूर मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत त्यांनी उद्योगांचे कार्यक्षम व्यवस्थान कसे करावे याबाबत विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते याच्यासोबत लघु उद्योग भरतीचे महाराष्ट्राचे सह-सचिव श्री. हरीश हांडे जी, वर्धा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियालिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण हिवरे जी, लघु उद्योग भरती वर्धा चे अध्यक्ष श्री. जगदीश पटेल जी, जिल्हा उद्योग केंद्र वर्धाचे तुषार आठवले जी इत्यादी उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा चे श्री. आर. एच ठाकूर, श्री. धीरज मनवर आणि श्री. सागर आंबेकर इत्यादी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशश्वीरित्या पार पाडावे यासाठी इन्फेड चे श्री. अमोघ तिजारे आणि IBFC वर्धा चे श्री. रुपेश रामगडे यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये