Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

समर्थ फार्मसी कॉलेज मध्ये डॉक्टर अमजद खान पठाण यांचे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर समुपदेशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था द्वारा संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी देऊळगाव राजा येथे कॅन्सर शास्त्रज्ञ डॉ. अमजदखान पठाण यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर आधारावर विस्तृत असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्यामध्ये कॅन्सर हा आजार कुठल्या कारणां मुळे होतो, या आजारा करता कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट दिल्या जातात आणि आपण काय काळजी घेऊ शकतो, या संपूर्ण गोष्टी सविस्तर त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी सांगितले.

राज्यपाल पुरस्कार प्राप्त, मुंबई रत्न पुरस्कार प्राप्त असलेले डॉ. अमजद खान पठाण यांचा सत्कार याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर प्रफुल ताठे यांच्या हस्ते करण्यात आला .त्याप्रसंगी उप प्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे, डॉ पुरुषोत्तम लड्डा, प्राध्यापक किशोर चराटे हे उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर अमजद खान पठाण यांनी महाविद्यालयाच्या डी. फार्म तसेच बी. फार्म च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सिंदखेड राजा येथे आयोजित कॅन्सर रोग निदान व चिकित्सा शिबिरा करिता विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहण्याकरिता त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सिताफळे यांनी तर आभार प्रदर्शन चराटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रा कोल्हे प्रा सानप प्रा उगले प्रागिरी प्रा उमेश पिंपळे यांनी प्रयत्न केले तसेच अलका राठोड पुरुषोत्तम शेरे वासू चौरसिया यांनी मेहनत घेतली आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये