अवैध हातभट्टी दारु विक्रेत्याविरुध्द कार्यवाही
एमपीडीए कायदयांतर्गत नागपुर कारागृहात स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन कारंजा (घाडगे), अंतर्गत मोजा इंदोरानगर, कांरजा (घाडगे) परिसरात अवैधरित्या हातभट्टीची गावठी मोहा फुलापासुन निर्मात तसेच देशी व विदेशी दारू विक्री करणारा अनमोलसिंग शेरसिंग बावरी, रा. इंदीरानगर, कोरजा (घाडगे) ता. कांरजा (घाडगे) जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन कांरजा (घाडगे), जि. वर्धा येथे सन २०२३ ते २०२४ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत एकुण १० गुन्हे दाखल आहेत, स्थानयध्य ईसमा विरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्यये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहु स्थानबध्द हा न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा फुलाच्या हातभट्टीची, तसेच देशी व विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात साठवणुक करुन तिची विक्री करीत होता. ज्यामुळे कांरजा (घाडगे) परिसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था याधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन कॉरजा (घाडगे) परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात महपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलीना खुप त्रास वाढत चालला होता.
ठाणे प्रभारी अधिकारी पोनी/महेश मधुकरराव भोरटेकर, यांनी एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांनी दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
आगामी नाताळ सण तसेच ३१ डिसेंबरचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारा विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणा-या दारु विक्रेत्यावर एमपीडीए कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा श्री. नरेंद्र फुलझेले तसेच मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. अनुराग जैन यांनी दिलेले आहेत, सन २०२४ साली आज पावेतो दारु विक्रते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर एकुण १९ एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत अशा प्रकारची कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हयातील अवैध दारु विक्रेत्यांमध्ये प्रचंड दहशती मध्ये आहे.
सदर प्रकरणी मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक, डॉ. सागर कवडे, डी. एस. खंडेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी, आयी, पोनी/ विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, पोनी/श्री. महेश मधुकरराव भोरटेकर, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. कारंजा (घाडगे), सपोनी/पंकज वाघोडे, सफी/संजय खल्लारकर, गिरीष कोरडे, पोहवा/अमोल आत्राम, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोउपनि गिरीधर पेंदोर, पोलीस अंमलदार/आशिष कलोकार, मंगेश मिलके पो.स्टे. कारंजा (घाडगे) यांचे पथकाने केली.



